Rahul Gandhi On Savarkar, मुंबई : सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचा वक्तव्याच काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi ) यांनी पुनरुच्चार केले आहे. फडणवीसांनीही सावरकरांचा माफीनामा वाचावा अस आवाहन देखील राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल झाली आहे. तर, राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निषेध प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
राहुल गांधींनी सावकरांविरोधात जे विधान केलं, त्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निषेध करण्यात आला. राहुल गांधींच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर केला. राहुल गांधींच्या विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री कॅबिनेट बैठकीत खेद व्यक्त केला, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यवीराचा अवमान सहन करणार नाही असा इशारा सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवारांनी दिला आहे.
राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्याविरोधात सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी तक्रार दाखल केली आहे. दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सावरकरांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेही रणजित सावरकर यांच्यासह उपस्थित होते. काँग्रेसच्या आरोपात काहीही दम नाही. माफी मागितल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. हा सत्तेचा खेळ आहे आणि काँग्रेसकडून त्यासाठी महापुरुषांचा अपमान होत असल्याची टीका सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी केली.