केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मातृशोक

रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाआई बंडू आठवले यांचे आज सकाळी ६.३० वाजता निधन झाले.

Updated: Nov 16, 2017, 11:03 AM IST
 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मातृशोक title=

मुंबई : रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मातृशोक झाला आहे. रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाआई बंडू आठवले यांचे आज सकाळी ६.३० वाजता निधन झाले.

पार्थिव अंत्यदर्शनासाठी वांद्रे येथे

सकाळी ६.३० वाजता गुरुनानक रुग्णालय बांद्रा मुंबई येथे वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. हौसाबाई यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज सकाळी ११.३० वाजल्यापासून, त्यांच्या राहत्या घरी संविधान बंगला, वांद्रे येथे ठेवण्यात येणार आहे.

अंत्यविधी दुपारी ५ वाजता

यानंतर आज दुपारी ५ वाजता वांद्रे पूर्व शासकीय वसाहत, उत्तर भारतीय संघ हॉल जवळील स्मशानभूमी येथे अंत्यविधी पार पडणार असल्याचं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून कळवण्यात आलं आहे.