राज्यसभा निवडणूक : शिवसेनेतून या तिघांची जोरदार चर्चा, हे नाव आघाडीवर

 ​Rajya Sabha elections: राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आता उमेदवार कोण याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये या निवडणुकीसाठी चढाओढ दिसून येत आहे. 

Updated: May 20, 2022, 11:36 AM IST
राज्यसभा निवडणूक : शिवसेनेतून या तिघांची जोरदार चर्चा, हे नाव आघाडीवर title=

मुंबई : Rajya Sabha elections: राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आता उमेदवार कोण याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये या निवडणुकीसाठी चढाओढ दिसून येत आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आता शिवसेनेतून तीन नावांची चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. यात शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 106 आमदारांस, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार असे एकूण 113 आमदार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. यानुसार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एक आणि भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर सहज जाऊ शकतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे समजत असल्याने संभाजीराजेंचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. तर संभाजीराजेंच्या नावाव्यतिरिक्त शिवसेनेत औरंगाबादचे चंद्रकांत खैरे आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.

तसेच संभाजीराजे यांना शिवसेनेने उमेदवारी न दिल्यास आणि संभाजीराजेंनी निवडणूक लढवायची ठरवल्यास शिवसेना मराठा समाजातील एखाद्या शिवसेना पदाधिकाऱ्याला रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.