मुंबई : शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक टू मुंबई असा भव्य मोर्चा काढलाय. हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलाय. या मोर्चाला शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलाय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय.
किसान सभेतर्फे आपल्या मागण्यांसाठी नाशिकहून मुंबई असा लाखो शेतकऱ्यांच्या लाँग मार्च काढलाय. लाखोंचा सहभाग असलेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून गेल्या मंगळवारी निघाला. तो मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे.
शेतकऱ्यांचा हा मोर्चा १२ मार्च रोजी मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. शेतकरी विधानभवनाला घेराव घालतील. शेतकऱ्यांच्या मोर्चाला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मोर्चाला पाठिंबा असल्याचं फोनवरून सांगितलं आहे, अशी माहिती किसान सभेचे सचिव अजित नवले यांनी दिली. मनसेचे कार्यकर्ते उद्या ठाणे आणि मुंबईत मोर्चातील शेतकऱ्यांचे जोरदार स्वागत करतील. तसेच रविवारी सकाळी ८ वाजता खारेगाव टोलनाका येथे ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. ठाणे आणि मुंबईतील नागरिकांनी शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेने केलेय.
Thane: All India Kisan Sabha's protest march continues. Over 30,000 farmers are heading to Mumbai from Nashik, demanding a complete loan waiver among other demands. The march will reach Mumbai on 12th March. #Maharashtra pic.twitter.com/2o8sybpCPZ
— ANI (@ANI) March 10, 2018