मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस

मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झालाय. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावलीये.

Updated: Sep 19, 2017, 06:44 PM IST
मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस title=

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झालाय. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावलीये. तर माटुंगा, चेंबूर आणि मुलुंडमध्येही जोरदार पाऊस बरसलाय.  

काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळं काहीसा गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळालाय. मात्र या पावसामुळं कुठेही रस्ते वाहतुकीची कोंडी अथवा लोकलचा खोळंबा झालेला नसल्याची माहिती आहे. 

शिवसेना भवनजवळ हॉटेल मनोहर जवळ रस्त्यावर झाड पडल्यामुळे शिवाजी पार्ककडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.  काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळं काहीसा गारवा निर्माण झाल्यानं दिलासा मिळालाय.