मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आता एसी ट्रेनमध्ये प्रवास करणे आणखी स्वस्त होणार आहे. वास्तविक, रेल्वे बोर्डाने मुंबईतील एसी लोकलच्या सिंगल प्रवासाचे भाडे कमी करावे, असा प्रस्ताव दिला आहे. मुंबईत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या भाड्याच्या आधारावर हे भाडे निश्चित केले पाहिजे, असे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.
जर रेल्वे बोर्डाचा हा प्रस्ताव मंजूर झाला, तर मुंबईकरांना एसीमध्ये सिंगल प्रवासासाठी 10 ते 80 रुपयांपर्यंत भाडे आकारले जाईल. म्हणजेच भाड्यात मोठी कपात होईल. सध्या प्रवाशांना यासाठी 65 ते 220 रुपये भाडे द्यावे लागते. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आखणी गारेगार होणार आहे.
रेल्वे बोर्डाचे म्हणणेनुसार, या निर्णयामुळे एसी गाड्यांमध्ये पीक आणि नॉन-पीक अवर्समध्ये प्रवाशांची चांगली संख्या असेल आणि लोकांना प्रवासातही बरीच सोय मिळेल. यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ लवकरच 238 एसी गाड्यांसाठी निविदा काढणार आहे. यामुळे रेल्वे आणि प्रवासी दोघांनाही सुविधा उपलब्ध होईल.