रेल्वे प्रवास महागणार, मुंबईकरांना भुर्दंड नाही

दिवसेंदिवस आता महागाईचा आकडा वाढत आहे.

Updated: Dec 31, 2019, 09:10 PM IST
रेल्वे प्रवास महागणार, मुंबईकरांना भुर्दंड नाही title=

मुंबई : दिवसेंदिवस आता महागाईचा आकडा वाढत आहे. तर नववर्षाच्या सुरूवातीला रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासूनच ही भाडेवाढ लागू होणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने याची घोषणा केली. त्यामुळे प्रवाशांच्या खिश्याला कात्री लागणार आहे.

वातानुकुलित शयनयानपासून (एसी) ते सामान्य श्रेणीपर्यंत (जनरल) रेल्वेने प्रति कि.मी.साठी १ ते ४ पैशांची वाढ केली आहे. नॉन एसी सेकंड क्लाससाठी प्रतिकिमी १ पैसा, स्लीपर क्लाससाठी प्रतिकिमी १ पैसा तर फर्स्ट क्लाससाठी प्रतिकिमी १ पैसा अशी भाडे वाढ करण्यात आली आहे.

ल एक्स्प्रेस गाड्यांसाठी सेकंड क्लाससाठी प्रतिकिमी २ पैसे, स्लीपर क्लाससाठी प्रतिकिमी २ पैसे तर फर्स्ट क्लाससाठीच्या भाड्यात प्रतिकिमी २ पैसे अशी वाढ करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या भाडेवाढीची घोषणा करण्यात आली आहे. 

तर वातानुकुलित चेअर कार, वातानुकुलित ३ टियर, वातानुकुलित २ टियर आणि प्रथम श्रेणीचे भाडे प्रति कि.मी. ४ पैशांनी वाढवले आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरूवातीलाच प्रवाशांचा रेल्वे प्रवास महागणार आहे.