मुंबई : देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लाक असणार आहे. मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या असून काही लोकल वीस ते पंचवीस मिनिंटं उशिराने धावणार आहेत. त्यामुळे गरज नसल्यास शक्यतो प्रवास टाळा जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक आज सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात मुलुंड ते कल्याण स्थानकादरम्यान धिम्या लोकल जलद मार्गावरून धावतील. तर हार्बर रेल्वेवर पनवेल ते मानखुर्द अप- डाउन मार्ग आणि नेरुळ ते बेलापुर-खारकोपर मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. हे मेगाब्लॉक सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० या ब्लॉक काळात असणार आहे.
Railway Megablock on 01.03.2020, Sunday@Central_Railway @WesternRly pic.twitter.com/rLTx6EDbIu
— m-Indicator - Mumbai Local (@m_indicator) February 29, 2020
तसेच बेलापूर/पनवेल/वाशी ते सीएसएमटी-बेलापूर/पनवेल/वाशी या दोन्ही अप-डाऊन मार्गवरील लोकलसेवा बंद असणार. तर पश्चिम रेल्वेमार्गावर देखील मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक बोरिवली ते गोरेगाव अप-डाऊन धीम्या मार्गावर असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी १०.३५ ते दुपारी ०३.३५ काळात असणार आहे.
सकाळी १०.3५ ते सायंकाळी ४ पर्यंत तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक आहे. यामुळे या काळात प्रवास करणं टाळा. अन्यथा प्रवासाला या अगोदर सुरूवात करा. मेगाब्लॉक हा प्रवाशांचा सुरक्षेचाच भाग आहे. त्यामुळे या काळात रेल्वे प्रशासनाला सहकार्य करणं हे प्रवाशांच कर्तव्य आहे.