Mumbai News : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) ने अलीकडेच मुंबईकरांसाठी (Mumbai) डिजिटल तिकीटाची (Digital ticket) योजना सुरु केली होती. प्रवाशांच्या वेळेत आणि पैशातही बचत अशा अनेक कारणांमुळे बेस्ट उपक्रमाने डिजीटल तिकीट सेवा सुरू करण्यात आली होती. त्याला हळहळू चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. डिजिटल तिकीट सेवा अधिक आकर्षक बनवण्यासाठी बेस्टने नवीन बस पास (Bus Pass) योजना जाहीर केली आहे. प्रवाशांच्या सोईसाठी सुपर सेव्हर प्लॅन, स्टुडंट पास, अनलिमिटेड राइड पास आणि सीनियर सिटीझन पासमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. या नवीन योजनांमुळे प्रवाशांना एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही बसेसमध्ये कोणत्याही योजनेसह प्रवास करता येणार आहे. या नवीन योजनेनुसार, प्रवाशांना दैनंदिन तिकीट खरेदीच्या तुलनेत 60 टक्क्यांपर्यंत बचत करण्यास मदत झाली आहे.
सध्या दिवसाला 34 ते 35 लाख प्रवासी हे बेस्ट बसमधून प्रवास करतात. यातील 30 लाख प्रवाशांकडे चलो हे मोबाइल अॅप आहे. बेस्टच्या बसचे तिकीट आणि पास खरेदी करण्यासाठी हे प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर या अॅपला पसंती दिली आहेत. त्यामुळेच केवळ आठ महिन्यात हे अॅप डाउनलोड करणाऱ्या प्रवाशांमध्ये पाच लाखांची वाढ झाली आहे. प्रवाशांना वॉलेट, यूपीआय, क्रेडिट-डेबिट कार्ड आणि चलो अॅपद्वारे डिजिटल तिकिट खरेदी करतात. रोज पाचपैकी एक प्रवासी ई-तिकीट खरेदी करत असून महिन्याला दोन कोटी ई-तिकीटांची खरेदी होत आहे. दुसरीकडे वर्षाच्या अखेरीस दररोज सरासरी 10 लाख प्रवाशांनी डिजिटल तिकिटांची निवड करावी असे बेस्टचे उद्दिष्ट आहे.
पास खरेदीमुळे प्रवाशांच्या तिकीटात 60 टक्क्यांपर्यंत बचत
बेस्टच्या डिजिटल सेवेमुळे बस पास सवलतीला अनेकांनी पसंती दिली आहे. या पासमुळे प्रवाशांच्या तिकीटाच्या दरात 50 ते 60 टक्के बचत झाली आहे.
प्रवाशांसाठी खास योजना
सुपर सेव्हर योजना
सुपर सेव्हर योजनेनुसार, सर्व-नवीन योजनेमुळे प्रवाशांना एसी आणि नॉन-एसी बसमधून प्रवास करता येतो आहे. 6 रुपये भाडे असणाऱ्या मार्गावरील पासचा दरही कमी झाला आहेत.
अनलिमिटेड राइड पास
1 दिवसाच्या अमर्यादित एसी राइड पासची किंमत 60 रुपयांवरून 50 रुपये आणि 30 दिवसांच्या पाससाठी 1,250 रुपयांवरून 750 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना लाभ
खाजगी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 30 दिवसांचा विद्यार्थी पास फक्त 200 रुपयांमध्ये लागू करण्यात आला आहे.
Chalo अॅपवर ही योजना उपलब्ध असणार आहे
कसा खरेदी कराल अॅप?
बेस्ट चलो अॅप आणि बेस्ट चलो कार्डवर प्रवासी योजना खरेदी करू शकतात. अॅपवर खरेदी करण्यासाठी त्यांना बेस्ट चलो अॅप डाउनलोड करावे लागेल. होम स्क्रीनवर 'बस पास' वर टॅप करून तुमच्या आवडीची योजना निवडा. तुमचा तपशील भरा आणि UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करा.