PUBG प्लेयर बनला चोर, आईचे 10 लाख घेऊन फरार

पब्जीचे दुष्परिणाम सर्वानाच कळले आहेत मात्र तरीही अनेक जण सुधारात नाही. 

Updated: Aug 28, 2021, 10:24 AM IST
PUBG प्लेयर बनला चोर, आईचे 10 लाख घेऊन फरार title=

मुंबई :  पब्जीचे दुष्परिणाम सर्वानाच कळले आहेत मात्र तरीही अनेक जण सुधारात नाही. 16 वर्षीय मुलाने पब्जीच्या नादात पालकांच्या लाखो रुपयांचे नुकसान केलं आहे.आणि वडिलांच्या भीतीने घरातून निघून गेला.अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलाला पब्जीचे व्यसन जडले होते. पब्जीच्या आय डी आणि यू जी प्राप्त करण्याच्या नादात 10 लाख रुपये खर्च केले. 

वडिलांच्या धाकाने त्याने भीतीपोटी चिठ्ठी ठेवून घर सोडले. अल्पवयीन मुलगा असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला. तपासात मुलगा स्वतः घर सोडून गेल्याचे निष्पन्न झाले तर गुन्हे शाखेच्या पथकाने 12 तासाच्या आत त्या मुलाचा शोध घेत त्याला पालकांच्या हवाली केले आहे .

 तो अभ्यासासाठी आईचा मोबाईल वापरत असे, मोबाईलमुळे तो पब्जी गेमच्या आहारी गेला. या गेममध्ये असणाऱ्या विविध टास्कच्या नादात त्याने आईच्या मोबाईल मधूनच आईच्या खात्यातील 10 लाख रुपये खर्च केले. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे त्याच्या वडिलांच्या निदर्शनास आले. 

अखेर वडिलांच्या भीतीने तो घरातून निघून गेला. जाताना त्याने 'जोपर्यंत पैसे कमवत नाही तोपर्यंत घरी परत येणार नाही' अशी चिठ्ठी लिहिली. मुलगा घरातून गेल्याने त्याच्या आईवडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली , पोलिसांनी तपासात अवघ्या 12 तासात अंधेरी परिसरातुन त्या मुलाला ताब्यात घेतले असून पालकांचे आणि मुलाचे समुपदेशन पोलिसांनी केले आहे.