'दिल्लीतील आशीर्वादामुळे मुख्यमंत्र्यांकडून मेहतांचा बचाव'

शहरातील ताडदेव झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये ५०० ते ८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. दिल्लीकरांचा आशीर्वाद असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Updated: Aug 8, 2017, 08:15 AM IST
'दिल्लीतील आशीर्वादामुळे मुख्यमंत्र्यांकडून मेहतांचा बचाव' title=

मुंबई : शहरातील ताडदेव झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये ५०० ते ८०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. दिल्लीकरांचा आशीर्वाद असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

दरम्यान, मेहता यांच्या चौकशीचे आदेश दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार चव्हाण यांनी मानले. मात्र, चौकशी होईपर्यंत मेहतांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चव्हाण यांची केली.

तर या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत केली जावी, संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या सर्व चालू प्रकल्पांची छाननी केली जावी आणि झोपडपट्टी पुनवर्सन योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारयांनी निवृत्तीच्या दोन आठवडे आधी मंजूर केलेल्या १३७ फायलींची फेरचौकशी व्हावी, आदी मागण्या त्यांनी केल्यात.

मुख्यमंत्र्यांनी मेहतांना तोंडी संमती दिली होती काय? तसे नसेल तर मग मंत्री खुशालपणे मुख्यमंत्र्यांचे नाव फाइलवर कसे काय नोंदवू शकतो? दोघांपैकी नेमके खरे कोण बोलतेय? एकनाथ खडसेंना लावलेला न्याय प्रकाश मेहतांना का लावला जात नाही? का त्यांना दिल्लीच्या विशेष आशीर्वादामुळे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे?, असा हल्लाबोल चव्हाण यांनी केलाय.