मुंबई : एसआरए घोटाळ्यामुळं अडचणीत आलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या सूत्रांनी झी २४ तासला ही माहिती दिलीय.
पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडलात फेरबदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं प्रकाश मेहतांच्या गृहनिर्माण मंत्रिपदावरून डच्चू मिळणार किंवा त्यांच्याकडून ते खातं काढून दुस-या खात्यात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
विरोधकांकडूनही मेहता यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जातेय.