मुंबई : मुंबईत पावसाचा जोर कायम असल्याने उपनगरातील पवई तलाव ओसंडून लागला आहे ,सुमारे ५२० एकर मध्ये असलेला हा पवई तलाव पर्यटकांना पावसात कायमच खुणावत असतो. तलाव ओवर फ्लो झाल्यावर पर्यटक इथे येऊन पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतात... मात्र इथे पर्यटकांचा अतिउत्साह अनेकदा अपघातास कारणीभूत ठरतो. तलाव ओव्हर फ्लो झाल्यावर पर्यटकांची पावलं तलावाकडे वळली,मात्र अपघात टाळण्यासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाने न केल्याच दिसून आलं.
रविवार संध्याकाळपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात दहिसर कांदिवली बोरिवली मालाड गोरेगाव जोगेश्वरी अंधेरी येथील सखल भागात पाणी जमा झाले आहे . हिंदमाता , सायन , अंधेरी सब वे , सायन , माटुंगा गांधी मार्केट सह मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलंय.
दरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेवरही वेळापत्रकाचे तीन तेरा वाजल्याचं स्पष्ट आहे.
वसईत आज पहाटे पासून पावसाने चांगलाच ज़ोर धरला आहें. त्यामुळे सकाळी कमावर जाणाऱ्या चाकरमान्याचे आणि शाळकरी मुलाचे हाल झाले आहेत.काल दिवसभर देखील पावसाचीं संतत धार सुरु होती.