मुंबई : राज्य सरकारच्या खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेचा अखेरचा दिवस आहे. डेडलाईन संपण्यासाठी काही तास उरले आहेत. झी मीडियाचा रियालिटी चेक केली आहे. मात्र, ८० टक्के खड्डे बुजवल्याचा सरकारने दावा केला आहे. मुबंई-गोवा महामार्गावर प्रवास केल्यानंतर हा दावा पोकळ असल्याचे दिसून येत आहे.
राज्य महामार्गावरचे ८० टक्के टक्के खड्डे बुजवल्याचा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय.. आज म्हणजे १५ डिसेंबरपर्यंत राज्य महामार्गावरचे सर्व खड्डे बुजवले जातील असं चंद्रकांत पाटील यांनी आश्वसन दिलंय. त्यानुसार राज्यात खड्डे भरण्याची मोहीम सुरू झाली.
पण झी २४ तासने राज्याच्या विविध भागात केलेल्या पडताळीत अनेक ठिकाणी झालेली रस्त्यांची चाळण आजही तशीच असल्याचं पुढे आलंय. त्यामुळे आता पुढे काही तास चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरःश खड्ड्यासाठी खर्च लागणार आहेत.
१५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्तीचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. ही डेडलाईन संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत.
मुंबई-नाशिक हायवेवर, मुंबई - गोवा महामार्गावर आजही खड्डे आहेत. कोकणात जाताना पनवेल ते माणगावपर्यंत नावाला चांगला रस्ता दाखविणे कठिण जाईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे खड्डेमुक्त महामार्गाच्या घोषणा ही नावाला असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे खड्ड्यांपासून मुक्तीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. असं असताना काही रस्ते अजूनही स्वतःचं नशीब उजळण्याची वाट पाहताहेत. पुणे सातारा महामार्गावरील कात्रज घाटातील रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्नही कायम आहे.