दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यभरातील रस्त्यांवर असलेल्या खड्यांवरुन चांगलचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे.
खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर सेल्फी विथ पॉटहोल्स ही मोहीम सुरू केली. यानंतर त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरच उत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळे यांच्या या मोहीमेला उत्तर देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पॉटहोल मुक्त महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरून ट्विटरवर उत्तर दिलं आहे.
#Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat.@ChDadaPatil pic.twitter.com/IKUdOriSz5
— Supriya Sule (@supriya_sule) November 1, 2017
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगात सुरू असल्याचे म्हटले आहे. याचा पुरावा म्हणून त्यांनी खड्डे बुजवण्याच्या कामाचे चार फोटोही शेअर केले आहेत.
राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगात सुरू - "इंदापूर - बारामती रस्ता"#PotholeMuktMaha pic.twitter.com/q1bl9IsLgC
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 3, 2017
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगात सुरू-Tisgaon Bahaduri Yeola Nandgaon Pilkhod Bahal SH25#PotholeMuktMahat pic.twitter.com/XqAM1ammjL
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 4, 2017
तासगाव, बहादुरी, येवला, नांदगाव, पिलखोड, बहल या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे हे फोटो आहेत. सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यासोबत सेल्फी काढून ट्विटरवर सरकारविरोधात जोरदार मोहीम सुरू केली होती, त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर नेत्यांनीही खड्ड्यासोबत सेल्फी काढून ते ट्विटरवर शेअर केले होते.
खड्डेमुक्त रस्ते दाखवा व रू. १००० जिंका. दिघी-पुणे राज्य महामार्ग, रायगड, अवस्था पहा, @ChDadaPatil #SelfiewithPotholes @supriya_sule pic.twitter.com/1T5zPzwlor
— Sunil Tatkare (@SunilTatkare) November 2, 2017
आता सरकारकडून विरोधकांच्या या मोहीमेला ट्विटरवरूनच उत्तर देण्यासाठी स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सरसावले आहेत. त्यामुळे खड्ड्यांवरून सुरू असलेले राजकारण आता सोशल मिडियावर गाजणार आहे.