Political News : सत्तांतरानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची महत्त्वाची बैठक

Political Crisis : भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेनेची (Eknath Shinde Group) महत्त्वाची बैठक होणार आहे. (Maharashtra Political News) सत्तांतरानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक होत आहे.

Updated: Jan 20, 2023, 11:21 AM IST
Political News : सत्तांतरानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची महत्त्वाची बैठक title=

Maharashtra Political Crisis :पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आज भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेनेची (Eknath Shinde Group) महत्त्वाची बैठक होणार आहे. (Maharashtra Political News) सत्तांतरानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक होत असून, अंतर्गत कुरुबुरींना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आहे. या बैठकीला शिंदे गट, भाजपचे सर्व आमदार आणि खासदार ऑनलाईन पद्धतीन उपस्थिती लावणार आहेत.

भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची महत्वाची बैठक होत असल्याने या बैठकीत काय होणार याची उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या प्रोग्राममध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासंदर्भात युतीतील नेते आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचवेळी विधान परिषद निवडणूक याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकिली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही ऑनलाईन उपस्थित राहून आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भाजप आणि शिंदे गटाचे काही वरिष्ट नेते मंत्री सहभागी होणार आहेत.

एकनाथ शिंदे बंडानंतर शिवसेनेत उभी फूट

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे 40 आमदार बरोबर घेऊन वेगळा गट स्थापन केला. या फुटीनंतर दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. आधी आमदार नंतर खासदार शिंदे गटात दाखल झालेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर तयार झालेल्या राजकीय पेच थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. न्यायालयाने दोन्हीही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतले आणि काही महत्वाचे निर्देश दिले. आता निकालाची प्रतिक्षा आहे.

शिवसेना नेमकी कोणाची ? आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का ? याकडे देशासह महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करु शकत नाही, असं सांगत त्यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे.  आता निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. दोन्ही बाजुंची सुनावणी पूर्ण झालेय. निकाल बाकी आहे. यापार्श्वभूमीवर आता भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची बैठक होत आहे.

दरम्यान, 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेत विश्वासमत प्रस्तावाला सामोरे जाण्याचे आदेश दिले. 3 जुलैला विधानसभेचं विशेष सत्र घेण्यात आले. अध्यक्षपदाची निवडणूक झाली. भाजप आमदार राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झाले. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाचा व्हीप मान्य केला. एकनाथ शिंदे यांनी विश्वासमत जिंकले. शिंदे-फडणवीस सरकारला 164 तर विरोधात 107 मते पडली. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थिर झाल्यानंतर उशिराने मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार होणे बाकी आहे. मात्र, भाजप आणि शिंदे गटात कुरबुरीत वाढ झाली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे. भाजपला झुकते माप मिळत आहे. तर शिंदे गटातील आमदारांना न्याय मिळत नाही, अशी नाराजी काही आमदारांतून दिसून येत आहे.