Anil Parab Office : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय पाडले

Maharashtra Political News : माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे.  वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली. (Political News in Marathi)

Updated: Jan 31, 2023, 08:00 AM IST
Anil Parab Office : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय पाडले title=
Anil Parab । Maharashtra Political News

Maharashtra Political News : माजी मंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. (Anil Parab Office) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. वांद्रे पूर्व भागातील परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई करण्यात आली. या पाडकामाच्या ठिकाणी किरीट सोमय्या आज दुपारी भेट देणार आहेत. (Political News in Marathi)

सोसायटीकडून स्वत:हून पाडकाम

अनिल परब यांच्या वांद्रे गांधीनगर येथे हे जनसंपर्क कार्यालय होते. त्यांचे हे कार्यालय अवैध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. या कार्यालयाच्या बांधकामाविरोधात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आज मंगळवारी हातोडा चालविण्यात येणार होता. दरम्यान, त्याआधीच कार्यालय असलेल्या इमारतीच्या सोसायटीकडून स्वत:हून सोमवारी पाडकामास सुरुवात केली. परब यांच्या कार्यालयाचे पाडकाम जवळपास पूर्ण झाले आहे.

2019 मध्ये म्हाडाकडे अनधिकृत कार्यालयाची तक्रार

गांधीनगर येथील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागेत अनिल परब यांचे जनसंपर्क कार्यालय होते. हे कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार विलास शेलगे यांनी 2019 मध्ये म्हाडाकडे केली होती. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या बांधकामाविरोधात कारवाईची मागणी केली होती. या तक्रारींची दखल घेत मुंबई मंडळाने अनधिकृत बांधकामाविरोधात नोटीस बजावली होती. परंतु हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले नव्हते तसेच कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांच्याकडून पुन्हा करण्यात आली होती. ट

आज म्हाडाकडून होणार पाहाणी

म्हाडाच्या मुंबई मंडळाने आज मंगळवारी या बांधकामावर हातोडा चालविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईसाठी पोलीस संरक्षणही घेण्यात आले होते. मात्र त्याआधी म्हणजे काल सोमवारी सोसायटी आणि परब यांच्याकडून पाडकाम करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आता आज मंगळवारी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असेही या म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.