'कोरोनाच्या संकटकाळात मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्त्वाचा अभाव दिसला'

मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीगत गाड्यांसाठी ई पासेसचा आदेश काढला आहे, तो ताबडतोब रद्द करावा.

Updated: Jun 8, 2020, 10:54 PM IST
'कोरोनाच्या संकटकाळात मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्त्वाचा अभाव दिसला' title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: कोरोनाच्या संकटकाळात देशात राजकीय नेतृत्त्वाचा अभाव दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:चे नेतृत्त्व सिद्ध करता आले नाही. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्तगुणाचा अभाव दिसला, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते सोमवारी मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी लॉकडाऊननंतरच्या राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. 

अजित पवारांकडून पंढरीच्या वारीत दुजाभावाचे राजकारण; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

देशात लॉकडाऊन संपण्याच्या मार्गावर आहे. देशातील कंपन्या चालू होतील. मात्र, या कंपन्या कामगारांना पोसणार कशा,  याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. फिजिकल डिस्टन्स पाहिजे म्हणून सार्वजनिक वाहतूक बंद ठेवणे योग्य आहे. पण ज्या कंपन्यांच्या मालकांकडे गाड्या आहेत अशा मालकांना गाडी बाहेर काढण्याची परवानगी देण्यात यावी. त्यांना ई पासेसची सक्ती करू नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

चांगली कामं करणारी लोकं भाजपमध्येच असतात; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

तसेच राज्यातीलउद्योग क्षेत्राला स्वतःच्या पायावरती उभे करायचे असेल तर उद्योग क्षेत्रातील माणसाला मुबलकता आणि कामानिमित्त फिरण्याची परवानगी दिली पाहिजे. त्याासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीगत गाड्यांसाठी ई पासेसचा आदेश काढला आहे, तो ताबडतोब रद्द करावा आणि त्यांना काम करण्याची संधी द्यावी. महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आणि मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. त्याची गती पुन्हा चालू होईल. मात्र, त्यासाठी येत्या दोन दिवसात ई पासेसचा आदेश रद्द करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.