प्लास्टिकबंदीच कोळीबांधवांकडून स्वागत

समुद्रात दिवसेंदिवस प्लास्टिकचं प्रमाण वाढतंय आणि याचा थेट परिणाम कोळी बांधवांच्या मासेमारीवर होतोयं.

Updated: Jul 1, 2018, 06:04 PM IST

देवेंद्र कोल्हटकर,झी मीडिया,मुंबई : समुद्राच्या लाटांवर मोठ्या प्रमाणात तरंगणार हे प्लास्टिक, समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्यांचा असलेला हा खच ही दृश्य माहीम च्या कोळीवाड्या लगत असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळत आहेत. याच सारखी परिस्थिती मुंबई मधील जवळ जवळ सर्वच समुद्र किनाऱ्यावर रोज पाहायला मिळते.समुद्रात दिवसेंदिवस प्लास्टिकचं प्रमाण वाढतंय आणि याचा थेट परिणाम कोळी बांधवांच्या मासेमारीवर होतोयं.

मासेमारीसाठी घातक

बारीक जिंगा,बारीक बोंबील,भोई मासा,जिरा,छोटे खेकडे हे आणि सर्वच प्रकारचे लहान मासे प्लास्टिक पिशव्या मध्ये अडकून मृत्युमुखी पडतात.शिवाय या प्लास्टिक मुळे कोळी बांधवांच्या जाळ्याच ही मोठं नुकसान होत.त्यामुळेच समुद्रात वाढणार प्लास्टिकचं प्रमाण कोळी बांधवांच्या मासेमारीसाठी घातक ठरू लागल आहे.
प्लास्टिक चा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे.त्यामुळे विविध मार्गांनी समुद्रात येणाऱ्या प्लास्टिक आता थांबावन अत्यंत गरजेच झाल आहे.नाहीतर येत्या काळात मासेमारी च्या दृष्टीने अत्यंत परिस्थिती भयावह असेल अशी भीती कोळी बांधवानी व्यक्त केली आहे.