मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेतला असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र आता असे लक्षात येते की तोडपाणी, जनतेला त्रास देणे, बेरोजगारीला आमंत्रण देणे यासाठीच हा निर्णय घेतला गेला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
सरकारने ब्रँडेड वस्तूंच्या पॅकेजवर बंदी घातलेली नाही, खरंतर यांच्या आवरणांचा पुनर्वापर होत नाही. प्लॅस्टिक नाईफ, चमचा, ग्लास, कॅरी बॅग या वस्तूंवर बंदी घातली आहे. या सगळ्या गोष्टी रिसायकल होतात. मग या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी का? , असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केला.
सरकारने ब्रँडेड वस्तूंच्या पॅकेजवर बंदी घातलेली नाही, खरंतर यांच्या आवरणांचा पुनर्वापर होत नाही. प्लॅस्टिक नाईफ, चमचा, ग्लास, कॅरी बॅग या वस्तूंवर बंदी घातली आहे. या सगळ्या गोष्टी रिसायकल होतात. मग या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी का? - @nawabmalikncp #PlasticBan #PressConference pic.twitter.com/RMvqXttSq6
— NCP (@NCPspeaks) June 28, 2018
सरकारने एक समिती नेमावी. कोणती वस्तू रिसायकल होते, कोणती नाही याचा तपास करावा आणि प्लॅस्टिकबंदीबाबत फेरविचार करावा. तोपर्यंत लोकांकडून दंड वसूल करू नये. या निर्णयामुळे चार लाख लोकांचा रोजगार गेला आहे. समितीच्या अहवालाने या लोकांचा रोजगार तरी वाचेल, असे नवाब मलिक म्हणालेत.