मुंबई पोलिसांनी केलं असं ट्विट, लोकांनी केलं सॅल्यूट

आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी मुंबई पोलीस जगभरात ओळखले जातात. ऑन फिल्डवर तत्पर असणारे मुंबई पोलीस सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह..

Updated: Apr 10, 2018, 06:31 AM IST
मुंबई पोलिसांनी केलं असं ट्विट, लोकांनी केलं सॅल्यूट title=

मुंबई : आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी मुंबई पोलीस जगभरात ओळखले जातात. ऑन फिल्डवर तत्पर असणारे मुंबई पोलीस सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असल्याचे पाहायला मिळतय. मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरून वेळोवेळी ट्रॅफिक अपडेट, बचावात्मक कार्य, जनजागृतीचे कार्याचे ट्विट्स पाहायला मिळतात. आजही अशाच प्रकारचे एक ट्विट मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवरून करण्यात आलं. या ट्विटला अनेक ट्विटर युझर्सनी रिट्वीट करत सॅल्यूट केला.

थोड्याच अवधीत या ट्विटला २ हजारहून अधिक रिट्विट आणि ४ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले. २०१५ मध्ये मुंबई पोलिसांनी आपल ट्विटर अकाऊंट सुरू केलं. याला ४० लाखाहून अधिक जण फॉलो करत आहेत.