Crime News : कोण कशी चोरी करेल याचा काही नेम नाही, एका चोराने चक्क अँडरपँटवर चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोराचा चोरी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चोरीमध्ये सात लाखांची कॅश लंपास केली आहे.
नेमकं काय प्रकरण-
मेगा मार्टमध्ये चोर व्हेंटिलेशनच्या बॉक्समधून आत आले. त्यामुळे चोर आत असल्याची कोणालाच खबर लागली नाही. कपड्यांच्या शोरूममध्ये एकदम आरामात चोरी केली. महत्त्वाचं म्हणजे कपड्याच्या शोरूम बाहेर सुरक्षारक्षक पहारा देत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व चोरटे अंडरवेअर आणि गंजी घातलेले दिसत आहे.
शोरूममध्ये पाच कॅश काउंटर होते, चोरांनी आरामात एक-एक काउंटर फोडले आणि सात लाखांची रोकड चोरली. त्यासोबतच चोरांनी महागड्या कपड्यांवरही डल्ला मारला. ही घटना बिहारची राजधानी असलेल्या पटना इथल्या राजा बाजारमधील आहे. कपड्याच्या शोरूमचे मॅनेजर सुभाष अग्रवाल यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
चड्डी-बनियान गँग काय आहे?
पटनामध्ये काही वर्षांपूर्वी चड्डी-बनियान गँगने धुमाकूळ घातला होता. या गँगची दहशत पसjली होती. मात्र मागील काही वर्षांमध्ये या टोळीने कुठेही चोरी केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे राजा बाजारमधील कपड्याच्या शोरूममध्ये झालेली चोरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. त्यामध्ये चोर हे अंडरपँटवर दिसून आले आहेत. त्यामुळे जुनी टोळी पुन्हा सक्रीय झाली की?, या टोळीच्या चोरी करण्याचा पद्धतीचा फायदा घेत चोरी केली आहे का?, हे शोधून काढण्याचं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.