मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना चांदीवाला आयोगाचा (Chandiwala Commission) आणखी एक समन्स बजावण्यात आला आहे. न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने हा समन्स बजावला आहे. परमबीर सिंह यांना हा चौथा समन्स आहे.
परमबीर सिंह यांनी या आयोगाविरोधात याचिका केली आहे. मात्र, याचिकेवर कोणतेही आदेश न झाल्याने सुनावणी सुरु आहे. परमबीर सिंह यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठीहा आयोग नेमण्यात आला आहे.
न्यायमूर्ती चांदिवाल चौकशी आयोगाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांना तिसऱ्यांदा हजर न झाल्याबद्दल 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चौथा समन्सची 30 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.