मुंबई : करणी सेनेचा ‘पद्मावत’ला विरोध कायम असून मनसे ‘पद्मावत’ला संरक्षण देणार आहे. त्यामुळे आता करणी सेना आणि मनसे आमनेसामने भिडण्याची शक्यता आहे. ‘पद्मावत’ सिनेमाला मनसेकडून संरक्षण देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे करणी सेना अधिकच आक्रामक झाली आहे.
राज ठाकरेंना काळं फासणार असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी दिला आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये करणी सेनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. अशात आता पद्मावत वादावरून मनसे आणि करणी सेना आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून करणी सेनेच्या ५० कार्यकर्त्यांना अटाक करण्यात आली आहे.
मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा (working president) शालिनी ठाकरे यांनीच याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. दुसरे असे की, मनेसेने 'पद्मावत'ला संरक्षणही देऊ केले आहे. यापूर्वी आम्हीही अनेक चित्रपटांना विरोध केला. मात्र, हा विरोध मुद्द्यांवर होता. चित्रपटाच्या आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही एकाही चित्रपटाला विरोध केला नाही, असे ठणकावून सांगतानाच 'पद्मावत'ला होत असलेल्या विरोधाला मनसेने ठाम विरोध केला आहे.