एसटीच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी केला प्रवास

 एसटी (ST) सेवा काल शुक्रवारी राज्यात आंतरजिल्हा सुरु झाली. पहिल्याच दिवशी एसटीमधून ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी प्रवास केला.  

सुरेंद्र गांगण | Updated: May 23, 2020, 08:17 AM IST
एसटीच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी केला प्रवास title=
ANI photo

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची  Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) एसटी (ST) सेवा काल  शुक्रवारी राज्यात आंतरजिल्हा सुरु झाली. पहिल्याच दिवशी एसटीमधून ११,१५१ पेक्षाजास्त लोकांनी प्रवास केला. एमएसआरटीसीचे कार्यवाहक उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले की, राज्य महामंडळात२००७ बस सेवा कार्यरत आहेत. प्रत्येक एसटीतून सरासरी सहा प्रवाश्यांनी प्रवास केला, परंतु प्रवाशांची संख्या हळूहळू वाढेल, असे ते म्हणाले.

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर MSRTCने पुन्हा आपले कामकाज सुरु केले आहे. त्यानुसार काल एसटीची सेवा सुरु झाली. रेड झोन वगळता राज्यभरात आंतरजिल्हा बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे. कोरोनव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोकांच्या अडचणी समजून  २२ मार्चपासून एमएसआरटीसीच्या सेवा अर्थात लाल डबा गाड्यांची सेवा सुरु करण्यात आली आहे. 

याआधी एसटी गाड्या केवळ मुंबई विभागातच धावत आहेत. तेही आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांसाठी. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून एसटी सेवेच्या माध्यमातून एमएसआरटीसीने राज्याच्या सीमेपर्यंत आणि राज्यातील सीमेवरील विविध जिल्ह्यांमध्ये तीन लाखाहून अधिक स्थलांतर केले. देशातील सर्वात मोठी राज्य रस्ते वाहतूक महामंडळाकडे सुमारे १८,००० बसेस आहेत.