विरोधी पक्षनेते अजित पवार अखेर कंटाळून मंत्रालयातून बाहेर, पाहा काय आहे कारण?

अजित पवार हे मंत्रायलयात अडीच तास वाट पाहिल्यानंतर निघून गेले आहेत.

Updated: Sep 21, 2022, 03:20 PM IST
विरोधी पक्षनेते अजित पवार अखेर कंटाळून मंत्रालयातून बाहेर, पाहा काय आहे कारण? title=

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) कंटाळून मंत्रालतून निघून गेले आहेत. कार्यक्रमासाठी अजित पवार 12 वाजता मंत्रालयात आले होते. पण मंत्रिमंडळ बैठक लांबल्यामुळे ते तीन तास माहिती जनसंपर्क सचिवांच्या कार्यालयात बसून होते. अखेर कंटाळून अजित पवार हे मंत्रालयातून निघून गेले आहेत. (Ajit pawar dispointed with cm eknath shinde and dcm devendra fadnavis)

अजित दादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीवर नाराज झाले आहेत. अडीच  तास वाट पाहून अजित दादा नाराज होऊन मंत्रालायच्या बाहेर पडले. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा (Fifa football world cup) बोधचिन्ह अनावरण सोहळा आज मंत्रालयात पार पडणातर होता. त्यासाठी अजित दादा आले होते. परंतु कॅबिनेट सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याना येण्यास उशीर झाला त्यामुळे अजित दादा नाराज झाले. पहिलं सरकार असतं तर उशीर झाला नसता असा टोला यावेळी त्यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

मंत्रीमंडळ बैठक लांबल्याने कार्यक्रम सुरु होण्यास वेळ लागला. अजित पवार मात्र बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मंत्रालयातून निघून गेले आहेत.