मुंबई : राज्यातील राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. भाजला इशारा देताना शिवसेनेला पाठिंबा देण्याचे म्हटले आहे. सध्या राज्याच्या राजकारणात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपा आणि शिवसेना युतीला बहुमत देऊन सरकार स्थापनेची संधी दिली आहे. परंतु दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यात अडकले आहेत. अजूनही सरकार स्थापन करण्याबाबत हालचाली होता दिसत नाही. आजची चर्चाची बैठकीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे बोलणीचे दरवाजे बंद झाले आहेत. यातच या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. राज्यात सरकार पडल्यास वेळप्रसंगी शिवसेनेला पाठिंबा दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने ५०-५० चा फॉर्म्युला सांगत सत्तेत निम्मा वाटा मागितला आहे. त्यामुळे शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर अडकली आहे, तर भाजप त्यावर कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. भाजप सेनेच्या आमदाराला फोडण्याबाबत बोलत असताना, शिवसेनाही इतर पर्यायांचा प्रयत्न करण्याचा दावा करत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीने वेळप्रसंगी राज्याच्या जनतेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेही आम्ही पाप करु इच्छित नाही, असे सांगत भाजपला इशारा दिला होता. वेळप्रसंगी आम्ही आमच्याकडे पर्याय आहेत, असे इशारा देताना भाजपला बजावले आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार याचीही उत्सुकता आहे.
दरम्यान, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले, 'आमच्याकडे पर्याय आहेत. परंतु अन्य पर्याय वापरून पाप करू इच्छित नाही. शिवसेनेला सत्तेची भूक नाही. या प्रकारच्या राजकारणापासून शिवसेनेने नेहमीच स्वत: ला दूर ठेवले आहे. 'येथे दुष्यंत नाही, ज्यांचे वडील तुरूंगात आहेत. आम्ही येथे आहोत, आम्ही धोरण, धर्म आणि सत्याचे राजकारण करतो. काँग्रेस कधीही भाजपबरोबर जाणार नाही.