मुंबई : ओखी वादळामुळे आलेल्या अनियमीत पावसाचा आरोग्यावर परिणाम होवू शकतो. ऊन, पाऊस आणि थंडी आलटून पालटून येत असल्यानं व्हायरल इन्फेक्शन वाढून सर्दी, ताप, खोकला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबचा त्रास होवू शकतो. तसंच जागोजागी पाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू, मलेरियाचा धोका संभवतो. त्यामुळे सद्यपरिस्थितीत सर्वांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात येतो आहे.
1. पाणी उकळून प्यावे
2. विनाकारण पावसात भिजू नका
3. उघड्या पायांनी साचलेल्या पाण्यातून चालू नका
4. घराशेजारी पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करा.