कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज

पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. 

Updated: Jun 24, 2017, 08:05 PM IST
कोकणात मुसळधार  पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज title=

मुंबई : पुढील चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा पावसाचा जोर नसेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. राज्यात आतापर्यंत ५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात पाणीटंचाईचे मोठे संकट आहे. धरण क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणातील पाणीसाठा कमी होत आहे.

तर दुसरीकडे कोयना धरणातही पाणीसाठी कमी झालाय. यामुळे याचा परिणाम वीज निर्मितीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात भारनियमनाचा सामना करावा लागतो, अशी भीती वर्तविण्यात आलेय.

दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात हलका, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपात पाऊस पडेल असा अंदाज, कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.