लालबाग, भायखळ्यात 'या' दिवशी पाणी नाही

लालबाग, भायखळा विभागात राहणाऱ्या नागरीकांना आपल्या किमान गरजेपुरतं पाणी २ दिवसात भरून ठेवाव लागणार आहे. 

Updated: Feb 18, 2018, 12:42 PM IST
 लालबाग, भायखळ्यात 'या' दिवशी पाणी नाही title=

मुंबई : लालबाग, भायखळा विभागात राहणाऱ्या नागरीकांना आपल्या किमान गरजेपुरतं पाणी २ दिवसात भरून ठेवाव लागणार आहे. 

कारण २१ फेब्रुवारीला नेव्हल डॉक व बीपीटीपासून ते थेट केईएम रुग्णालयापर्यंतच्या भागात पाणी येणार नसल्याचे सागंण्यात आले आहे. सकाळी १० वाजल्यापासून रात्री १० पर्यंत या विभागात पाणी नसणार आहे. 

कुठे सुरू आहे काम ?

 रफी अहमद किडवाई मार्गावर नव्या १५०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीचे काम 

भंडारवाडा जलकुंभ याठिकाणी जुन्या १२००मि. मी. व्यासाच्या बाबुला टँक जलवहिनीची दुरुस्ती 
  
 नया नगर, म्हातारपखाडी व शिवडी कोर्ट जंक्शन येथील जलवाहिनीची जुन्या जलवाहिनीसोबत जोडणी