नितेश राणेंचा पुन्हा एकदा शिवसेनेवर शाब्दिक वार

मुंबईकर टॅक्स कशासाठी भरतात?

Updated: Oct 28, 2020, 12:59 PM IST
नितेश राणेंचा पुन्हा एकदा शिवसेनेवर शाब्दिक वार title=

मुंबई : राणे कुटुंबिय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वाद काही थांबायचं नाव घेत नाही. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी राणेंवर टीका केल्या नंतर हा वाद आणखी पेटला. नारायण राणेंनी याला प्रत्युत्तर दिल्यानंतर आता नितेश राणेंनी ट्विट करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर शाब्दिक वार केले आहेत. 

मुंबईकर टॅक्स कशासाठी भरतात. हे ट्विटमधून सांगण्यात आलं आहे. १. पेग्विन २. कंगनाची केस लढणाऱ्या वकिलांची फी आणि आता काय राहिलं तर.... यांच्या मुलांचं लग्न देखील आपल्याच पैशाने होणार की काय? असा सवाल त्यांनी या ट्विटमधून विचारला आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात नारायण राणे आणि त्यांच्या मुलांची तुलना ही 'बेडकाने बैल पाहिला' या गोष्टीशी केली होती. त्यानंतर नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन याला प्रत्युत्तर दिलं. पण हा वाद काही थांबायचं नाव घेत नाही.

नितेश राणेंनी ट्विट करून हा मुद्दा पेटत ठेवला आहे. सुरूवातीपासून धरून ठेवलेला राणीच्या बागेतील पेग्विनचा मुद्दा तर आहेच. पण त्यासोबत कंगना प्रकरण देखील मुंबईकरांना भारी पडत असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे.