NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Updated: Apr 1, 2023, 12:23 PM IST
NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO  title=
nita mukesh ambanis cultural centre inauguration celebrity Political leaders video viral on Social media mumbai news in marathi

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: भारतातील पहिल्यावहिल्या मल्टी कल्चर आर्ट सेंटरचं शुक्रवारी मोठ्या थाट्यामाट्यात लोकार्पण झालं. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉप्लेक्समध्ये रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचा कल्चरल सेंटरचं उद्घाटन सोहळा पार पडला. (Mumbai News)

भारतीय संस्कृती, कलेचं वैविध्य दर्शवणारं हे व्यासपीठ असणार आहे. देशभरातील विविध कलेचे प्रकार, नृत्य, अभिनय, संगीत, साहित्य क्षेत्रातील कार्यक्रम या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं वैशिष्ट्यं असणार आहे. (Nita Mukesh Ambani Cultural Center video)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या भव्य दिव्य सोहळ्याला बॉलिवूडसह हॉलिवूडचे प्रख्यात तारे उद्योगातील लोकांसह राजकारणी, धार्मिक नेते, क्रीडा क्षेत्रातील नामावंत लोक होती. चला तर पाहूयात कोण कोण या भव्य कार्यक्रम आले होते ते....(nita mukesh ambanis cultural centre inauguration celebrity Political leaders  video viral on Social media mumbai news in marathi)

मुकेश अंबानी, नीता अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लूकने सर्वांचं लक्ष वेधलं.

लाँचच्या वेळी नीता अंबानी म्हणाल्या की, मला सांस्कृतिक केंद्राकडून मिळत असलेल्या समर्थनामुळे खूप आनंद होत आहे. हे जगातील सर्वोत्तम सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. सर्व कला आणि कलाकारांचं इथं स्वागत आहे.''

 

 

सुपरस्टार रजनीकांत, आमिर खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, प्रियांक चोप्रा, वरुण धवन, सोनम कपूर, अनुपम खेर, जावेद अख्तर, शबाना आझमी, सुनील शेट्टी, शाहिद कपूर, विद्या बालन, आलिया भट्ट, दिया मिर्झा, श्रद्धा कपूर, श्रेया, राजू हिरानी, ​​तुषार कपूर यांसारख्या बॉलिवूड स्टार्सने सजली होती. कैलाश खेर आणि मामे खान देखील उपस्थित होते. 

 

 

 

 

 

 

एम्मा चेंबरलेन, गीगी हदीद यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॉडेल्स या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. 

या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, स्मृती इराणी आदी राजकारणीही उपस्थित होते. 

 

सद्गुरु जग्गी वासुदेव, स्वामी नारायण पंथाचे राधानाथ स्वामी, रमेश भाई ओझा, स्वामी गौर गोपाल दास या आध्यात्मिक नेत्यांची अलौकिक उपस्थितीही प्रेक्षकांना आवडली.

पाहुण्यांच्या सत्कारात सांस्कृतिक केंद्राने पंख पसरले. दुसरा भारतरत्न सचिन तेंडुलकर त्याच्या ट्रेडमार्क स्मितसह उपस्थित होता, तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, लॉन टेनिसपटू सानिया मिर्झा आणि ऍथलीट दीपा मलिक देखील कलाकारांना आनंद देण्यासाठी केंद्रावर पोहोचले.

 

 

या सेंटरमध्ये तीन नाट्यगृह, 2000 आसनांची क्षमता असणारं नाट्यगृह, लहान कार्यक्रमांसाठी 250 आसनक्षमता असणारं स्टुडिओ थिएटर आहे. 

विशेष म्हणजे या केंद्रातील कार्यक्रम हे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निशुल्क असणार आहेत.