मुंबई : केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती तेथील लोकांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. इतकंच नाही तर केरळवासियांच्या मदतीसाठी बॉलिवूडकर देखील सरसावले. त्यातच आता देशातील सर्वात मोठ्या बिजनेस ग्रुपने अंबानी ग्रुपने या पीडितांसाठी आपला खजिना उघडला आहे. केरळमधील पूरग्रस्तांना त्यांनी करोडोंची मदत केली आहे.
इतकंच नाही तर बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सुशांत सिंग राजपूत, जॅकलिन फर्नांडिस, सनी लिओनी आणि अक्षय कुमार यांनी पूरग्रस्तांना मदत केली. सुशांत सिंगने केरळवासियांना १ कोटींचे दान दिले तर सनी लिओनीने ५ कोटींची मदत केली. तर बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांनी केरळ पीडितांना ५१ लाखांची मदत केली. त्याचबरोबर खालसा अॅंड ग्रुप तर्फे अभिनेता रणदीप हुड्डाने देखील केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला.
यात रिलायन्स फाऊंडेशनचे चेअरपर्सन नीता अंबानींने पूरग्रस्तांना २१ कोटींची मदत करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर पीडितांसाठी काही सामानही पाठवण्यात आले आहे. ज्याची किंमत सुमारे ५० कोटी इतकी आहे.
मदतीची घोषणा करताना नीता अंबानींनी सांगितले की, ''देशाचे नागरिक असल्याने आमचे हे कर्तव्य आहे की, आम्ही पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी काही मदत करु.''