मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर NIAकडून सचिन वाझे यांचे रिक्रीएशन (NIA Recreates) करण्यात आले. वाझे यांना सदरा घालून चार वेळा चालायला लावले. यावेळी फॉरेन्सिक टीमचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, सचिन वाजे हे मुंबईत सापडलेल्या संशयास्पद कार आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणातील भूमिकेविषयीच्या वादाने घेरले आहेत. (NIA : Sachin Vaze walk the scene)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएच्या तपासाला वेग आला आहे. काल रात्री सचिन वाझे यांना थेट घटनास्थळी नेऊन सीन रिक्रिएशन करण्यात आले. वाझे यांना तीनवेळा आहे त्याच वेषात तर नंतर सदरा घालून चालायला लावण्यात आले. अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवली त्यावेळी सचिन वाझे त्याठिकाणी हजर होते, असा एनआयएला संशय आहे.
संपूर्ण नाट्य रुपांतर कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आले आहे. पुण्यातून आलेल्या फॉरेन्सिक टीमने संपूर्ण रिक्रिएशन केले आहे. या रिक्रियेशनच्यावेळी एनएआयचे वरीष्ठ अधिकारी हजार होते. या नाट्यरूपांतराचे चित्रीकरण पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. दरम्यान, एटीएसने आतापर्यंत सचिन वाजे यांची चार वेळा चौकशी केली आहे. तर संशयित कारच्या प्रकरणाची चौकशी एनआयएकडून चौकशी करण्यात येत आहे.