मुंबई : शहरात लालबाग, परळ, दादर, महालक्ष्मी, वरळी या परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. दुपारी चांगला पाऊस झाला. दरम्यान, येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत आज सकाळी साडे पाच पर्यंत कुलाबा 56.6 मिमी, सांताक्रुझमध्ये 40.98 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबईच्या काही भागात येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्याप्रमाणे पश्चिम उपनगारतही काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील असाही अंदाज वर्तवण्यात आलाय.
रात्रीच्या पावसाने रेल्वे वाहतुकीवर थोडासा परिणाम झालाय. हार्बर मार्गावर मानखुर्द येथे रुळाखालील खडी वाहून गेल्याने सकाळी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
तर मुंबई उपनगरात काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे रस्ते वाहतूकीवर मात्र परिणाम झाला. रस्त्यावर पडलेली झाडं बाजूला करण्यासाठी प्रशासनानं रात्रीच काम सुरू केलं आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक संध्याकाळी विस्कळीत झाले. बोरिवलीकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. एलफिस्टन येथे ओव्हरडेड वायर शॉर्टसर्किटने तुटली. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला.