सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी, हॉटेल मालक मात्र द्विधा स्थितीत

कमला मिल कम्पाऊंडमधल्या अग्निकांडानंतर मुंबई महापालिकेनं शहरभरात धडक कारवाई सुरू केलीये. आजदेखील ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 31, 2017, 09:21 AM IST
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी, हॉटेल मालक मात्र द्विधा स्थितीत title=

मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधल्या अग्निकांडानंतर मुंबई महापालिकेनं शहरभरात धडक कारवाई सुरू केलीये. आजदेखील ही कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे आज थर्टीफर्स्ट असल्यामुळे मुंबईकरांनी पार्टीची तयारी सुरू केलीये. अशा वेळी पार्टीसाठी तयार रहायचं की कारवाईची भीती बाळगायची या द्विधा मनस्थितीत हॉटेल व्यवसायिक आहेत. 

ऐन थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या मुहूर्तावरच पालिकेचे कर्मचारी परवानग्या पायदळी तोडलेल्या हॉटेल्सवर पूर्ण फौजफाटा घेऊनच  प्रेस हॉटेल्सवर धडकत असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना आपले थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचे प्लान्स आवरते घ्यावे लागले आहेत. नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनीही चोख व्यवस्था केलीये.