शपथविधी होताच अजित पवारांविषयी रोहित पवार म्हणाले....

अजित पवारांसोबत... 

Updated: Nov 27, 2019, 01:48 PM IST
शपथविधी होताच अजित पवारांविषयी रोहित पवार म्हणाले....  title=
शपथविधी होताच अजित पवारांविषयी रोहित पवार म्हणाले....

मुंबई : कर्जत- जामखेड या मतदारसंघातून निवडून येत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबातील आणखी एक नाव जोडलं गेलं. संयमी वावर, वरिष्ठांप्रतीचा आदर, जनसामान्यांत रमणारा 'आपला' नेता अशी प्रतिमा असणारं नाव म्हणजे रोहित पवार. 

निवडणुकीच्या शर्यतीत यशस्वी झाल्यानंतर अखेर जवळपास एका महिन्याहून जास्तीचा वेळ दवडला गेला आणि बुधवारी विधानभवनात या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. यावेळी रोहित पवार यांनाही आमदारकीची शपथ देण्यात आली. शपथविधीनंतर माध्यमांशी संपर्क साधत रोहित यांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीविषयीचा आशा व्यक्त केल्या. 

पहिल्याच वेळेस आमदारकी मिळवलेल्या रोहित यांनी आपल्या मनात आता फक्त सेवेची भावना आहे, असं म्हणत जनतेने जी संधी दिली आहे, जे प्रेम दिलं आहे त्या आपल्या मतदार संघातील जनतेसाठी काम करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी या सर्व प्रक्रियेला अपेक्षेहून जास्त वेळ दवडल्याचा सूरही त्यांनी आळवला.

... असा पार पडला युवा आमदारांचा शपथग्रहण सोहळा 

राज्यातील गरजू युवकांसाठी अखेरपर्यंत झटत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कुटुंबातील एकंदर घडामोडींमुळे दु:ख होत होतं. पण, मंगळवारी जेव्हा खुद्द अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शपथ घेतली, पुढे आपणही त्यांची भेट घेतली या क्षणी आनंदाचीचत भावना असल्याचं रोहित पवार यांनी व्यक्त केलं. 

'साहेब', म्हणजे शरद पवार आणि अजित पवार याच्याच मार्गदर्शनाखाली आपण आजवर काम केलं आहे आणि यापुढेही करत राहू असं ठामपणे म्हणत कौटुंबीक कलहाची चर्चा त्यांनी दूर सारली. 

अजित पवार पुन्हा सक्रीय होणार का? 

आमदार, नेते आणि विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनी पक्षात परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच धर्तीवर रोहित पवार यांनी येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार राजकारणात पूर्णपणे सक्रीय दिसतील अशी हमी दिली. ते राष्ट्रवादीचेच होते, आहेत आणि यापुढेही राहतील असं सांगतत मुळात मतभेद आपण कधी कवटाळून बसलो नाही ही बाब त्यांनी स्पष्ट केली. 

एकंदरच रोहित पवार यांचा हा अंदाज, आत्मविश्वास आणि सनमानसासाठी काम करण्याचीची त्यांची धडपड पाहचा राज्याच्या राजकारणातलं युवा पर्व ते गाजवणार का, हे त्यांच्या कारकिर्दीचं भवितव्य निर्धारित करणारं ठरेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.