अल्पवयीन पोरीसोबत केलेलं लग्न बेकायदेशीर...

महाविकासआघाडीचं 'आम्ही 162' शक्तीप्रदर्शन ो

Updated: Nov 26, 2019, 07:48 AM IST
अल्पवयीन पोरीसोबत केलेलं लग्न बेकायदेशीर... title=

 मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ सुरू आहे. सत्तास्थापनेसाठी प्रत्येक पक्ष बहुमताच्या आकड्याचा दावा करत आहे. अशावेळी महाविकासआघाडीने 'आम्ही 162'चा दावा केला. या शक्तीप्रदर्शनावर भाजपचे नेते आशिष शेलारांनी टीका केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेलारांना टोला लगावला आहे. 

जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करून त्याला उत्तर दिलं आहे. 'हा पोरखेळ नाहीये, वडीलधाऱ्या लोकांच्या सहमतीने/आशीर्वादाने वाजतगाजत होणारे लग्न आहे. पळवून आणलेल्या अल्पवयीन पोरीसोबत केलेलं बेकायदेशीर लग्न नाही जिथे ते सिद्ध करायला घाबरून कोर्टात दिवस ढकलताय. लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांनी आपले बघावे बहुमताचा दांडू तुमची विटी करणार' अशा शब्दात टोला लगावला आहे. (हे पण वाचा - ओळख परेडनं संख्याबळ सिद्ध होतं नाही- आशिष शेलार)

 

भाजपनेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडीच्या 'आम्ही 162' च्या शक्तीप्रदर्शनावर टीका केली होती. ओळखपरेड ही आरोपींची होते. पण आपल्याच आमदारांना आरोपी समजणे ही लोकशाहीचा अपमान आहे. हा जनतेचा अनादर असल्याची टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली. महाविकास आघाडीने मुंबईतील ग्रॅंड हयात मध्ये 'आम्ही १६२' या सोहळ्याअंतर्गत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

ओळखपरेडमुळे विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाचे संख्याबळ ठरत नाही. अशा प्रकारामुळे आत्मबल गमावलेल्यांचा आत्मबल परत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न या ठिकाणी दिसल्याचे शेलार यावेळी म्हणाले. आज महाराष्ट्र आणि मराठी माणसाने शरमेने मान खाली घातली असेल. बाळासाहेबांच्या नातवाने सोनिया गांधींच्या नावाची शपथ घेतली. हे समस्त देशाने पाहिलं. शिवसेनेचं हिंदुत्व किती बेगडी आहे हे संपूर्ण देशाने पाहिल्याची टीका त्यांनी शिवसेनेवर केली.