Anil Deshmukh : जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; हातात संविधानाची प्रत अन्...

जेलमधुन बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सुटकेनंतर अनिल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. स्वागत रॅली दरम्यान हातात संविधानाची प्रत घेऊन अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Updated: Dec 28, 2022, 07:09 PM IST
Anil Deshmukh : जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; हातात संविधानाची प्रत अन्...   title=

Anil Deshmukh first reaction : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh) यांची अखेर जेलमधून सुटका झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत केले. जेलमधुन बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सुटकेनंतर अनिल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. स्वागत रॅली दरम्यान हातात संविधानाची प्रत घेऊन अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. तब्बल 14 महिन्यांनतर अनिल देशमुख यांना जामीन मंजुर झाला असून ते जेल बाहरे आले आहेत. न्यादेवतेवर माझा विश्वास आहे. मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले असे अनिल देशमुख म्हणाले.  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख तब्बल सव्वा वर्षानंतर तुरूंगातून बाहेर आले. नागपूरमधल्या त्यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाके फोडून मिठाई वाटून समर्थकांनी आनंद व्यक्त केला गेला. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी गर्दी केली होती. देशमुख तुरुंगाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलं उधळली. अजित पवार, जयंत पाटील यांनी देशमुखांची भेट घेतली. या नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवत आनंद साजरा केला. अनिल देशमुखांचा मुलगा हृषिकेष देशमुख आणि त्यांची मुलगीही स्वागताला उपस्थित होते. अनिल देशमुखांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह जीपमधून त्यांची मोठी रॅलीही निघाली. अनिल देशमुखांची सुटका झाली असली तरी त्यांना मुंबईबाहेर जाण्याची परवानगी नाही.  

अनिल देशमुखांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाईक रॅली अडवली

अनिल देशमुखांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाईक रॅली अडवण्यात आली. मुंबई पोलिसांनी ही रॅली अडवली. अनिल देशमुख सुटल्यानंतर भायखळा जेल ते सिद्धिविनायक अशी रॅली काढण्यात आली होती. नेहरु तारांगणाच्या जवळ मुंबई पोलिसांनी ही रॅली अडवली. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांची काही प्रमाणात हुज्जतही झाली. त्यानंतर काही काळानं पोलिसांनी ही बाईक रॅली पुढे सोडली.