हायकोर्टाच्या निर्णयावर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले

ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा केला होता

Updated: Nov 22, 2021, 08:51 PM IST
हायकोर्टाच्या निर्णयावर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले title=

मुंबई : 'सत्यमेव जयते' असं बोलत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना कुणी गैर करत असेल... कोण अन्याय करत असेल तर त्याविरोधात माझा लढा कायम सुरुच राहणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. 

समीर दाऊद वानखेडे याच्या वडिलांनी नवाब मलिक यांना कुटुंबाच्या विरोधात बोलण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती परंतु उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना बोलण्यापासून रोखता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

या देशामध्ये बोलण्यावर बंदी कुणी घालू शकत नाही. जर एखादी व्यक्ती जबाबदारीने बोलत असेल तर प्रत्येक नागरिकाचा तो मौलिक अधिकार आहे. परंतु काही लोकांना हे कळलं नाही असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

हायकोर्टात काय झालं?
ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्यावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. पण या सुनावणीत ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे आहेत, असं प्रथमदर्शनी वाटत नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. 

तसंच नवाब मलिक यांना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यास मुंबई हायकोर्टाने दिला नकार दिला आहे.