मुंबई : Navneet Rana and Ravi Rana Latest Update : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याच्या दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्याने त्यांचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे. राणा दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिलला मुंबई सत्र न्यायालय सुनावणी करणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या याचिकेवर 29 एप्रिल पर्यंत उत्तर देण्यासाठी सरकारला न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानंतर जामिनावर सुनावणीची तारीख देण्यात येणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडून वेळ मागितला होता. त्यांची मागणी न्यायालयाने मान्य करत सरकारला उत्तर देण्यात सांगितले आहे.
14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याची जामिनासाठी धावाधाव सुरु होती. मात्र, आजही दिलासा मिळालेला नाही. आता 29 एप्रिलला जामिनावर सुनावणी होणार आहे. राणांच्या जामीन याचिकेवर सरकारला उत्तर देण्यासाठी सत्र न्यायालयाने 3 दिवसांचा अवधी दिला आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राणांची याचिका फेटाळल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जामिनीसाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात नवनीत राणांना मोठा दणका बसला. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी राणांची याचिका मुंबई उच्चन्यायालयाने फेटाळून लावली. सुट्टीकालीन न्यायालयाने राणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 27 एप्रिल रोजी जामिनावर लेखी युक्तिवाद होईल आणि 29 एप्रिल रोजी प्रत्यक्ष युक्तिवाद होणार आहे. 29 एप्रिलपर्यंत राणा दांपत्यास न्यायालयीन कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. नवनीत राणा यांना भायखळ्याच्या महिला कारागृहात, तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात आहे.