Crime News : अमानुषपणाचा कहर! चिमुरडीने अभ्यास केला नाही म्हणून तिने थेट इलेक्ट्रीक लायटर काढला अन्...

Navi mumbai News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास केला नाही म्हणून एका चिमुरडीला टीचरने अमानुष शिक्षा दिली आहे. 

Updated: Dec 14, 2022, 02:09 PM IST
Crime News : अमानुषपणाचा कहर! चिमुरडीने अभ्यास केला नाही म्हणून तिने थेट इलेक्ट्रीक लायटर काढला अन्... title=
Navi mumbai Crime News girl burn injuring teacher punished nmp

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : छडी लागे छम छम, विद्या येई घमघम...पूर्वी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही तर शिक्षक त्यांना कोंबडा होण्याची किंवा हातावर छडी मारायचे...पण नवी मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षकेने अभ्यास केला नाही म्हणून अमानुष शिक्षा दिली आहे. ती शिक्षा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. 

अमानुषपणाचा कळस!

दिलेला अभ्यास नीट करत नाही म्हणून रागाच्या भरात ट्यूशन शिक्षिकेने कहर केला आहे. तिने 8 वर्षांच्या चिमुरडीला इलेक्ट्रीक लायटरने हाताला चटके दिले. ही घटना नवी मुंबईतील वाशीमधील सेक्टर 3 मध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. (Navi mumbai Crime News girl burn injuring teacher punished)

शिक्षेकेवर कारवाई

पीडित मुलीच्या वडिलांनी यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्या शिक्षिकेने अजून कुठल्या मुलांसोबत असं कृत्य केलं किंवा नाही त्याचा तपास सुरु आहे.