Supriya Sule Corona Positive | खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन दिली माहिती

Updated: Dec 29, 2021, 02:05 PM IST
Supriya Sule Corona Positive | खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण title=

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

याआधी काल राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ
कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय. कोरोनाची तिसरी लाट मुंबईच्या उंबरठ्यावर असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नव्या नियमांची माहिती दिली. राज्याला आठ दहा दिवसात २० जानेवारीपर्यंत ५ ते ६ हजार ऍक्टिव्ह रुग्ण होते. मात्र आता ११ हजार ०९२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज संध्याकाळी अंदाजे २२०० रुग्ण होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 

मागील ७ दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा डबल झाले आहे. मुंबईत रोज ५१ हजार चाचण्या केल्या जात आहेत. यात २२०० पॉझिटिव्ह आले तर ४ टक्के पॉझिटीव्हीटी रेट मुंबईचा जात आहे. असं असेल तर चांगल नाही, काळजी घेण्याची गरज आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे म्हणाले.