मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुलाखतीत वारंवार म्हणतायत, माझीच माणसं विश्वासघातकी ठरली. उद्धवजी बाळासाहेबांनंतर तुम्ही कोणत्या शिवसैनिकाला विश्वास दिला का? कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांनाची आत्मियतने विचारपूस केली का, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
तसेच मला मारायचाही प्लान होता, ज्यांनी सुपारी दिली त्यांनीच मला सांगितलं, असा गौप्यस्फोटही राणेंनी केला. संजय राऊत-उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर राणेंनी पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केले. (narayan rane critic to shiv sena uddhav thackeray at mumbai over to various point)
राज्यातला शिवसैनिक, आमदार, खासदार अडचणीत असताना त्यांना मदत केली? मातोश्री बाहेच्या एका तरी शिवसैनिकाला तुम्ही कधी मदत केली आहे, त्याला प्रेम दिलं का, विश्वास दिला का, या प्रश्नांना उत्तर नाहीए.
अनेक आमदार आता बोलतायत चार चार वर्ष आम्ही यांच्याकडे वेळ मागतोय, पण मिळत नाही. चार, पाच तास वर्षाबाहेर थांबलो वेळ नाही मिळत. आता कशाला त्यांना गद्दार म्हणतायत.
एकनाथ शिंदे यांना मारायलाही सुपारी दिली होती नक्षलावाद्यांना, हा काय पहिला प्रयोग नाही. साहेबांनी मोठी केलेली कार्यक्षम, कर्तबार माणसं शिवसेनेत तयार व्हायला लागली, त्यावेळेला एकेकाला कमी करण्याचं काम यांनी केलं.
रमेश मोरे यांची हत्या कुणी केली. जयेंद्र जाधव यांची हत्या कोणी केली, ठाण्याचे एक नगरसेवक त्याची हत्या कोणी केली? नारायण राणे यांनी 2005 ला शिवसेना सोडली, तेव्हा देशातल्या, देशाबाहेरच्या गँगस्टर्सना सुपाऱ्या देण्यात आल्या. पण तेव्हा बोललो नाही, कारण मी समर्थ होतो तोंड द्यायला, मी वाचलो माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने. ज्यांना सुपारी दिल्या ते माझ्याशी बोलले आहेत आम्हाला असं काम मिळालं आहे, तुम्ही सावध राहा आम्ही नाही तर दुसरे करतील.
उद्धव ठाकरे म्हणजे एक नंबरचा नाटकी माणूस आहे. चार भिंतीच्या आत नाटकं करतो आणि नंतर टीव्ही आहेच.
महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या योजना राज्यासाठी वापरल्या. शेतकरी, कामगार, उद्योजक असो तेरा कोटी जनतेच्या आयुष्यात काय परिवर्तन केलं.
अडीच तासात उद्धव ठाकरे केवळ तीन तास मंत्रालयात आले. कधी छाती पकडतो, कधी ढोपरं पकडतो, दुखत होतं तर मुख्यमंत्री झाला कशाला, हॉस्पीटलमध्येच राहायचं, मातोश्रीच्या बाहेर दोन खाटा टाकून घ्यायाच्या.