मुंबई : नालासोपाऱ्यात भाजपच्या वार्ड अध्यक्षांची दादागिरी समोर आली आहे. भूखंड आणि खोल्या हडप करण्यासाठी स्थानिक गुंडांना सोबत घेऊन खुलेआम घरात घुसून, हातात कोयते घेऊन राहिवाशांना मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसून येतं आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणवणारे भाजप वार्डाध्यक्षांकडूनच ही दादागिरी सुरू असून भावेश नंदू किणी असे भाजप वार्ड अध्यक्षांचे नाव आहे. नालासोपारा पूर्वेतल्या संतोष भूवन बावशेतपाडा इथल्या भाजपचे वार्डाध्यक्ष आहेत. तर हातात कोयता घेऊन खुले आम रहिवाशांना धमकावणारा अभिषेक सिंग आहे.
चक्क अंगातील शर्ट काढून हातात कोयता घेऊन लोकांना धमकावत आहे. हा सर्वप्रकार cctv कैद झाला आहे. या सर्व प्रकाराने रहिवासी भयभीत झाले आहे. तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या प्रकारावर परिसरातील नागरिक काहीही बोलण्यास देखील तयार नाही. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यावर तरी भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी काही कारवाई करतील हा हे आता पहाव लागणार आहे.