मुंबई: मध्य रेल्वेच्या मार्गावर घाटकोपर आणि कुर्ला दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळं सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र हा तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर आता ही वाहतूक हळूहळू पूर्व पदावर येत आहे.
लक्षावधी मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मध्य रेल्वेची सेवा कोलमडली होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागला. यातून महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायीकही सुटले नाहीत. सर्वांनाच रेल्वेच्या मंदगतीचा फटका बसला.
घाटकोपर आणि कुर्ला दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली होती. वेळापत्राचे तीन तेरा वाजले होते. सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतूकीचा बोऱ्या वाजल्यानं कामावर निघालेल्या सगळ्यांनाच ऑफिसात पोहचायला उशीर झाला.