मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणी जरा जपून वापरा, शहरातील 'या' भागांना फटका

Mumbai Water Cut: एकीकडे उन्हाळ्याचे चटके तर दुसरीकडे अवकाळी पाऊस... असे असताना मुंबईकरांना आणखी एका समस्येला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील काही भागात 15 टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी वापरताना जरा सांभाळून वापरा...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 13, 2023, 12:58 PM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाणी जरा जपून वापरा, शहरातील 'या' भागांना फटका title=
Mumbai water Supply

Mumbai Water Cut News: मुंबईकरांसाठी (Mumbai News) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर कपडे, भांडी किंवा अन्य कामासाठी पाण्याचा जास्त प्रमाणात वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मुंबईत (Mumbai Water Supply) पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे किमान 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव व धरणांमध्ये 32 टक्केच जल्लसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो (mumbaikar) पाणी जरा जपूनच वापरा...

खोदकामामुळे पाणीकपात

ठाण्यात खोदकाम सुरू असताना जलबोगद्याचेही नुकसान झाले. परिणामी मुंबईचा (Mumbai water cut) पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यानंतर या दुरुस्तीसाठी  जलबोगद्या बंद करावा लागला. यावेळी पर्यायी मार्ग म्हणून भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचवणे आवश्यक असल्याने 31 मार्चपासून मुंबई पालिकेने एक महिन्यापासून 15 टक्के पाणीकपात सुरू केली. याचा फटका मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागांना पाणीपुरवठाचा बसला.  

या भागात 50% पाणीकपात 

मुंबईतील अनेक भागात तब्बल 50% पाणीकपात करण्यात आली. यामध्ये वांद्रे, लिकिंग रोड, चॅपल रोड, कलिना, अंधेरी अशा उच्चभ्रू वस्त्यांमधील नागरिक पाणीकपातीमुळं त्रस्त आहेत. जलवाहिनी फुटल्यानं मुंबई महापालिकेने 15 टक्के पाणीकपात जाहीर केली. मात्र प्रत्यक्षात 50 पाणीकपात करण्यात आल्यानं नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. याचबरोबर मुंबईतील अक्सा मस्जिद, जोगेश्वरी पूर्वेला, हिल पार्क कॉम्प्लेक्स, मालाड, भंडारपाडा, कुंभारपाडा, राजन पाडा, ओर्लेम चर्च कॉम्प्लेक्स, कांदिवली चारकोप कॉम्प्लेक्स, बोरिवली एक्सर, बोरिवली शिंपोली, अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी आदी भागांवर पाणीकपातीचा मोठा फटका बसला आहे.

धरणांमध्ये 32 टक्के पाणीसाठा

तसेच पाणीकपातीमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलाव आणि धरणांमध्ये 32 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.

या भागात शनिवारी पाणी येणार नाही

मुंबईतील कुर्ल्यात गेल्या काही दिवसापासून पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. परिणामी 6 मे पर्यंत दर शनिवारी पाणीकपात असणार आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार या भागात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन दुरुस्त करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे काम ४ मार्चपासून सुरू झाले असून ते ६ मेपर्यंत चालणार आहे. यावेळी कुर्ल्यातील खैराणी रोडचा रिकामा तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदिर दरम्यानची पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्त करण्यात येणार आहे.