मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवलं

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

Updated: Aug 10, 2017, 11:11 AM IST
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवलं title=

मुंबई  : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडं मुंबई विद्यापीठाचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर व्हीजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांची प्र कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलीय. 

मुंबई परीक्षांचा निकाल वेळेवर न लागल्यानं कुलगुरू संजय देशमुख अडचणीत आलेत. निकाल लावण्यासाठी राज्यपालांनी देशमुखांना 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र त्या मुदतीत सर्व परीक्षांचा निकाल जाहीर करणं मुंबई विद्यापीठाला शक्य झालं नाही. त्यामुळंच राज्यपालांनी कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.