Idol Admission Deadline : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. संस्थेकडून जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत 30 जून 2023 पर्यंत होती. ही प्रवेशाची मुदत 15 जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आजपर्यंत या सत्रात पहिल्या फेरीत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात 7 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
यूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र , एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमाचेही प्रवेश सुरू आहेत.
पदवीस्तरावरील बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी,बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे.पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.
अ. क्र. अभ्यासक्रम विद्यार्थी संख्या
१. प्रथम वर्ष बीए : 1636
२. प्रथम वर्ष बी. कॉम : 2325
३. प्रथम वर्ष बीकॉम अकाउंट्स अँन्ड
फायनान्स : 204
४. प्रथम वर्ष बीएस्सी आयटी व
कॉम्प्युटर सायन्स : 212
४. प्रथम वर्ष एमए : 1082
५. प्रथम वर्ष एमकॉम : 1468
६. प्रथम वर्ष एमएस्सी : 159