Mega Water Cut in Mumbai Thane : मुंबई आणि ठाण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण मुंबई (Water Cut in Mumbai) आणि ठाण्यात (Water Cut in Thane) पुढील दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आज आणि उद्या 31 जानेवारीला मुंबईतील काही भागात नळांना पाणी येणार नाही आहे.
भांडुप संकुलमधील जलशुद्धीकरण ( BMC Water Cut In Mumbai ) केंद्रातील जलवाहिनी जोडण्याचं काम केलं जाणार आहे. अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी तोडण्याचं काम आज आणि उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज आणि उद्या पाणीकपातीचं संकटाला सामोरे जावं लागणार आहे.
मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहिती असं सांगण्यात आलं आहे की, 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत काही विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने येणार आहे. मुंबईतील आज नेमक्या कुठल्या विभागात पाणीपुरवठा होणार नाही ते जाणून घेऊयात. (mumbai thane water cut in today and tomorrow Water supply will be shut off in this area marathi news)
ठाणेकरांनो आज तुमच्या नळाला पाणी येणार नाही. कारण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ठाणे महापालिकेने (TMC) आज 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या सुधारणा आणि मजबुतीकरणासाठी हे काम केलं जाणार असल्याच सांगण्यात आलं आहे. आज दुपारी 12 वाजेपासून मंगळवारी 31 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंत नळाला पाणी येणार नाही आहे.
सोमवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद (१/७)
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) January 27, 2023
दिवा आणि मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणार मुंब्रा बायपास, किस्मत कॉलनी, चांद नगर, एमएम व्हॅली आणि मुना फायरब्रिज या भागात आज आणि उद्या 12 वाजेपर्यंत पाणी येणार नाही.